चारोळ्या
आज एक चूक घडली,
ती माझ्यावर चिडली, स्वतः बनून अबोली, गजरा मात्र विसरली |
जगात चाललेल्या अन्यायाविरुद्ध
काहीतरी करायचे म्हणून त्यांनी घेतले फक्त आपले डोळे घट्ट मिटून .... |
तुझ्या पत्राची राहिली नाही
आता मुळीच आस कधी भेटलीस अचानक तर बोल मात्र हमखास |
दोन डोळ्यांनी केली
किती हि जादुगिरी कवींच्या लेखणीतून दिसे त्यांची किमयागिरी .. |
तू पाहता क्षणी मजला
काळजाचे ठोके चुकले लाजेचा पडदा येतामधे डोळे माझे आपोआप झुकले . |
माझ्या डोळ्यांची भाषा
तुझ्या डोळ्यांनी बोलशील का? सावली सारखी सखे माझ्या सोबत चालशील का? |
माझीया मना
नाद सोड आता ती नाही तुझी मान्य कर आता |
आवडत्याला आवडतं म्हणायचंय....
नावडत्याला नावडतं म्हणायचंय.... खोट्यात घुसमटून कंटाळलाय जीव.... जरा मोकळं मोकळं व्हायचंय.... मला"मी"बनून जगायचंय.... |